
वडगाव मावळ:
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती.
इयत्ता चौथी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन पटाचा आढावा घेणारी इंग्रजी ,मराठी व हिंदीतून भाषणे केली.
नेहा असवले आणि पूजा कालेकर यांनी सूत्रसंचालन केले.
कांचन जाचक , रुपाली जाधव, ऐश्वर्या मालपोटे, स्नेहा जगताप,स्वाती पाटील,अमिता जोशी अविनाश जाधव यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
प्रतिमा पूजन उपप्राचार्या प्रियांका कुडे यांनी केले.प्राचार्य राज कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे




