दिव्यांगाच्या योजना तळागाळातील दिव्यांगापर्यंत पोचवण्यासाठी कटिबद्ध राहणार: ज्योती राजीवडे
तळेगाव दाभाडे :
दिव्यांगांच्या अनेक सरकारी योजना शासनामार्फत येतात परंतु त्यांचा योग्य माहिती नसल्याने अनेक दिव्यांग व्यक्ती हे त्या योजना पासून वंचित राहतातत्या योजनांची अधिकाधिक माहिती मिळावी या उद्देशाने तळेगाव शहर अध्यक्ष  ज्योती भरत राजीवडे यांच्या पुढाकारातून दिव्यांग जनसंपर्क मेळावा घेण्यात आला.
अर्चना म्हाळसकर -(अध्यक्ष राष्ट्रीय सहायक समिती ) नारायण ठाकर(अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना ) (संघटक)संभाजी शेळके (उद्योजक तळेगाव शहर)मनिषा यादव,सारीका ढमाले ( रा.कॉ. दिव्यांग पुणे जिल्हा सरचिटणीस) गणेश शेंडगे (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस ), ज्योती भरत राजीवडे (अध्यक्ष तळेगाव शहर दिव्यांग रा.कॉ.)भरत राजीवडे (अध्यक्ष मावळ तालुका चित्रपट सृष्टी राष्ट्रीय काँग्रेस) बाजीराव ढमाले (संचालक राष्ट्रवादी दिव्यांग सेल मावळ तालुका)सुभाष  शेडगे (अध्यक्ष रा. कॉ. दिव्यांग सेल मावळ)साजन येवले (उपाध्यक्ष रा.कॉ. दिव्यांग मावळ) वासुदेव लखीमले (कार्याध्यक्ष मावळ रा.कॉ दिव्यांग) किसन गरवड (सरचिटणीस मावळ रा.कॉ. दिव्यांग)प्रथमेश बनसोडे (कान्हेगाव अध्यक्ष दिव्यांग) संपत लांडगे (डोणैगाव अध्यक्ष दिव्यांग)संदीप लोखरे
(दिवडगाव अध्यक्ष दिव्यांग)
कु. सत्यम भरत राजीवडे (युवा नेते )शालिनी भांगरे( महिला उपाध्यक्ष मावळ दिव्यांग)बाबुराव आडिवळे (सरपंच भोईरे) व इतर मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांग जनसंपर्क मेळाव्यात  दिव्यांगांना हक्क देऊ, संधी देऊ त्यांना प्रोत्साहन देऊ , त्यांच्या विविध योजनांची माहिती मार्गदर्शन,गावचा ग्रामीण भागातील 5% निधी मिळणेबाबत चर्चा करण्यात आली. दिव्यांगांचे अंत्यदय रेशनकार्ड मिळणे बाबत घरकुल योजनेची माहिती मिळवण्याबाबत संजय गांधी योजनेची माहिती  नारायण ठाकर (अध्यक्ष मावळ तालुका रा.कॉ.)(संजय गांधी योजना समिती) यांनी उपस्थितांना दिली.
त्यावेळेस दिव्यांगांना सन्मानित करण्यात आले उत्कृष्ट दिव्यांग जोडींना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.अर्चना म्हाळसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे आभार दिव्यांग सेल तळेगाव शहर अध्यक्ष ज्योती राजीवडे यांनी मानले.सुत्रसंचालन सुभाष शेडगे (अध्यक्ष रा.कॉ. दिव्यांग सेल मावळ) यांनी केले.

error: Content is protected !!