तळेगाव दाभाडे:
वराळे येथील युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात  (अजित पवार गट) प्रवेश केला आहे.आमदार सुनिल  शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
खरेदी विक्री संघाचे संचालक निलेश मराठे म्हणाले ” वराळे गावात अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पार पाडली , असे युवा सहकारी प्रसाद शिवाजी मराठे, बंटी अशोक मराठे,  नवनाथ चव्हाण,सुरेश म्हासळकर, गणेश जाधव,   हर्षद जाधव, राहुल सरोदे, अमोल ठाकर, विजय त्रिभुवन, अक्षय कारके अविनाश घारे, आनंद कांबळे, मयूर मते, आणि  इतर सहकार्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला
आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या सर्वाचे स्वागत केले.ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप आंद्रे उपस्थित होते.

error: Content is protected !!