मावळ तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील कामाच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी व भविष्यातील राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी महाविकास आघाडीतील “काँग्रेस – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), आरपीआय (निकाळजे गट) ची  बैठक झाली.
नागरिकांचे विविध प्रश्न, शेतकऱ्याची व्यथा यावर एकत्रित आंदोलन उभारणे, महिलांचे प्रश्न सोडवणे, विविध शासकीय योजना, चालू असलेला कामातील भ्रष्टाचार, प्रशासनातील अरेरावीपणा, येणाऱ्या पुढील काळातील लोकसभा, विधान सभा, स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुका एकत्रित पणे लढविणे अशा महत्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
२७ ते ३० डिसेंबर रोजी खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा मध्ये सहभागी होण्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. सरकारच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी ताकद देण्यात येईल असे आश्वासन सर्व प्रमुख पदाधिकारी माजी मंत्री मदन बाफना , ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, रामदास काकडे, दिलीप ढमाले, शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवक काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष गणेश काजळे, माजी नगराध्यक्ष प्रमोद गायकवाड ,रोहिदास वाळुंज  मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, शादान चौधरी, जयश्री पवार, पुष्पा भोकसे, किसन कदम, राजेश वाघोले, सुनिल शिंदे, मदन शेडगे, शांताराम भोते, मिकी कोचर, बारकू ढोरे, पांडुरंग दाभाडे,, संभाजी राक्षे, सुधाकर वाघमारे, कैलास पवार,भरत राजीवडे, गफूरभाई शेख, मधुकर कंद, नासिर शेख, मारुती आडकर, सहादू आरडे, रमेश घोजगे, योगेश चोपडे, आदिनाथ मालपोटे, अक्षय मुऱ्हे, शंकर मोढवे, नवनाथ केदारी, सोपान पवार, वैभव कार्ले,प्रतिक घोजगे उपस्थित होते.काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी स्वागत केले.तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ.यांनी प्रास्ताविक केले.अतुल राऊत यांनी सुत्रसंचालन केले.अध्यक्ष विशाल वहिले यांनी आभार  मानले.

error: Content is protected !!