वडगाव मावळ:
मावळ तालुका काँग्रेस ,मावळ तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस मावळ (शरद पवार गट ) यांच्या महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होत आहे.
  शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.००  वाजता काँग्रेस नेते  रामदास काकडे यांच्या तळेगाव दाभाडे येथील कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.
  या बैठकीत आगामी निवडणुका एकत्रित लढविणे,तालुक्यातील विविध नागरी समस्यांवर  संयुक्त  आंदोलन,खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील  शेतकरी आक्रोश मोर्चा संसंदर्भातील सहभाग या विषयी या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते.

error: Content is protected !!