वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) तालूका व जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पुणे जिल्हा सरचिटणीस पदी रमेश घोजगे, मावळ विधानसभा मतदार संघ सहकार सेल अध्यक्षपदी सुधाकर मारुती वाघमारे, मावळ तालुका महिला अध्यक्ष पदी जयश्री पवार, मावळ तालुका आध्यात्मिक व वारकरी आघाडी अध्यक्ष पदी योगेश पांडुरंग चोपडे,मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष पदी अक्षय नारायण मुऱ्हे, सोशल मीडिया अध्यक्षपदी नवनाथ ज्ञानेश्वर केदारी, उपाध्यक्ष पदी सोपान नथू गोंटे यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार अमोल कोल्हे , पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम माजी मंत्री मदन बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा मनोदय नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारती शेवाळे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोद गोतारणे, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे,शंकर मोढवे, योगेश करवंदे,पंकज भामरे, जितेंद्र कालेकर,नरेंद्र मुऱ्हे,सिद्धेश मुऱ्हे ,आकाश जगदाळे,प्रतीक मुऱ्हे,आकाश साळुंखे उपस्थित होते.
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम