कामशेत:
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘एस.ई.सी. सेंटर ऑफ इंडिपेंडंट लिव्हींग’ (नायगाव)  भेट दिली.
एस.ई.सी.सेंटरच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. ही भेट शाळेतील एस.एस.आर उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आली होती. या भेटीचा मुख्य उद्देश वस्तू व धान्य स्वरूप देणगी देण्याचा होता.
यावेळी शाळेतील इ.९ वी १० वी चे सर्व विद्यार्थी, सहशिक्षक, मुख्याध्यापिका उपस्थित होते.’एस.ई.सी सेंटर ऑफ इंडिपेंडंट येथील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी केलेला हा प्रयत्न होता. सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी शाळा नेहमीच कार्यरत असते. व आपण या समाजाचा एक भाग म्हणून त्याची जबाबदारी उचलणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. ही शिकवण आपल्या विद्यार्थ्यांना शाळा आपल्या उपक्रमातून नेहमीच देत असते.
  गेली आठ वर्ष शाळा सतत अशा सामाजिक संस्थांना उपयोगी वस्तूंची मदत “जॉय ऑफ गिव्हिंग ” ह्या उपक्रमाच्या माध्यमातून करत आहे. विद्यार्थ्यांमध्ये देखील “जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा “ह्या संस्कारांचे रोप ह्या कृतीतून पेरले गेले.
यावेळी शाळेकडून १३० किलो तांदूळ, साठ किलो गहू, तसेच प्रत्येकी ५० पाकिटे फराळ व शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.
या शाळेला भेटीसाठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील व सामाजिक कार्यकर्ते तानाजी मराठे यांनी नियोजन केले.

error: Content is protected !!