वडगाव मावळ:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विठ्ठल परिवार मावळ व मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव आयोजित तालुकास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचा शुभारंभ शंकरराव शेळके आणि मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून संपन्न झाला.
मावळ तालुक्यातील सुमारे दिडशेहून अधिक भजनी मंडळांनी या भजन स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात या भजन स्पर्धेस सुरुवात झाली असून या स्पर्धा सलग तीन दिवस चालू असणार आहेत. यावेळी शंकरराव शेळके, हभप शंकरराव मराठे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, हभप गणेश महाराज जांभळे, हभप नितीन काकडे, महेंद्र ढोरे, दिलीप खेंगरे, दत्ता केदारी, नारायण ठाकर, लक्ष्मण सातकर, प्रकाश जाधव, मुकूंद राऊत,बाळू आडकर, बाबाजी बालगुडे, बाळासाहेब जांभूळकर, रुपाली नाणेकर परिक्षक राधाकृष्ण गरड, गणेश मोहिते, अजित लोहार आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका तसेच वारकरी संप्रदायातील भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला महाराष्ट्र ही साधु संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.सर्व संतांनी आपल्या अभंगातून समाजाला एक नवी दिशा दिली. हा असा एकोपा, प्रेम, स्वयंशिस्त, भक्तीभाव आपल्याला अशा भजन स्पर्धांमधून पहायला व शिकायला मिळते.असा हा भक्तिमार्गाचा वारसा जतन करण्याचे व तो पुढे नेण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असा विश्वास मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे यांनी व्यक्त केला.