टाकवे बुद्रुक:
येथील शिवशाही मित्र मंडळ हे गणेश उत्सव , शिवजयंती , नवरात्र, दहीहंडी या सणांबरोबर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करत असते .यावर्षी  मंडळाने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून टाकवे बुद्रुक येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजित केले होते.
यामध्ये अंदर मावळ व टाकवे परिसरातील 160 लोकांनी आपले नेत्र तपासणी करून घेतली   व त्यामध्ये ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा व्यक्तींची पुढील उपचाराकरता नारायणगाव येथे रुग्णालयामध्ये उपचाराकरता पाठवले आहे. हा  उपक्रम राबवल्याबद्दल टाकवे परिसरातून या मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  हे शिबिर यशस्वी करण्याकरता होण्याकरता टाकवे गावचे माजी उपसरपंच स्वामी जगताप. माजी संचालक दिलिप आंबेकर. मंडळाचे सचिव बाबाजी असवले, संभाजी धामणकर, विष्णू लोंढे. माजी संचालक नंदू असवले. प्रकाश करवंदे. शंकर गुणाट सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गायकवाड यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!