
कामशेत:
येथे नव्याने नेत्र रूग्णालय सुरू होत आहे,नेत्र रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या पूर्वेला सवलतीच्या दरात तपासणी आणि शस्त्रक्रिया करण्याची घोषणा व्यवस्थापनाने केली आहे. कांचन पार्वती नेत्रालय नावाने हे नेत्रालय सुरू होत आहे.महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा व डाॅ.अशोक दाते यांनी हे नेत्रालय सुरू केले आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर हे नेत्रालय सुरू होणार असून पहिल्या शंभर शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.
मोतीबिंदू,काचबिंदू,तिराळेपणा,डोळयाचा पडदा सरकणे या प्रकाराच्या विविध शस्त्राक्रिया होणार आहे.तेही फक्त ७९९९ रुपयात या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मुथा आणि दाते यांनी केले आहे.नोंदणी फी पाचशे रूपये आहे.नोंदणी धारक शंभर रुग्णांपैकी १५ भाग्यशाली रुग्णाच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केली जाणार आहे.
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी 9822403422, 8799870018 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




