कार्ला:
वेहरगाव येथील रिक्षाचालक रितेश पडवळ यांच्या प्रामाणिकपणाचे रिक्षाचालकांच्या विश्वासार्हतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झाला.य रिक्षा चालकाने पंचक्रोशीत कौतुक होत आहे.याने  सापडलेला मोबाईल भावीकाला परत दिला.हा बाब आई एकविरा च्या दर्शनाला येणा-या भाविकांच्या निदर्शनास आल्याने भाविकही त्याचे अभिनंदन करीत आहे.
त्याच झाले असे, आई एकवीरा देवीचा नवरात्र उत्सव सुरु आहे.आईचे भक्त अर्जुन जाधव हे सातारा येथून परिवारा सह रविवारी आई एकवीरा देवीच्या दर्शन घेण्यासाठी कार्ला वेहेरगांव येथे आले होते .
दर्शन घेऊन गडावरून खाली येण्यासाठी त्यांनी रिक्षा केली ती रिक्षा रितेश पडवळ यांची होती घाई गडबडीत उतरताना 18000 हजार किमतीचा मोबाईल हा रिक्षा मध्येच पडला. त्यांना पुणे सोडून पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपला मोबाईल पडला आहे.
त्यांनी वेहेरगाव येथील नवरात्री उत्सव शुभेच्छा बॅनर वर देवकर,पडवळ,बोत्रे,गायकवाड, देशमुख ही नावे वाचली होती त्यांनी लगेच त्यांचे मित्र प्रमोद वहिले यांचे मामाचे गाव आहे हे लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्या मोबाईल वरुन फोन केला.
प्रमोद वहिले यांनी त्यांचे मामा सुनिल देवकर यांना फोन करुन मोबाईल कोणत्यातरी रिक्षा मध्ये राहीला का चौकशी केली.
सुनिल देवकर यांनी त्यांच्या सर्व रिक्षाचालक यांना विचारणा केली असता रितेश पडवळ यांनी इमानदारी दाखवत मला एक मोबाईल सापडला आहे, असे सांगितले.
प्रमोद वहिले यांना फोनवरून माहिती दिली असता त्यांचा आहे ही खात्री झाल्यावर त्यांचे तो मोबाईल प्रमोद वहिले यांचे भाऊ शैलेश वहिले यांच्या कडे सोमवारी संध्याकाळी रितेश पडवळ, सुनिल देवकर, अजिंक्य पडवळ, नवनाथ गायकवाड , देवकर यांनी मोबाईल दिला.
   रितेश पडवळ यांना अर्जुन जाधव यांच्या वतीने शैलेश वहिले यांनी इमानदारी दाखवल्या बद्द्ल बक्षिस  देऊन धन्यवाद दिले. अर्जुन जाधव यांनी त्या सर्वांना फोन करून आभारही  मानले.

error: Content is protected !!