तळेगाव स्टेशन:
मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ‘मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमाचे आयोजन करण्यात आला. मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सी.बी.एस.ई तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद यांच्या आदेशान्वये “मेरी मिट्टी मेरा देश” हा उपक्रम “आजादी का अमृत महोत्सव”या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला.
प्रत्येक गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती,प्रेम, आणि साक्षरता निर्माण व्हावी हा या मोहिमेचा हेतू होता. अभियानाच्या पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी  “पंचप्राण” या तत्वाविषयी सहपाठ घेऊन आपली देशाप्रती व मातृभूमी प्रति असलेली निष्ठा व्यक्त केली.
त्यानंतर मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात “अमृत कलश यात्रा ” प्रभात फेरी स्वरूपात काढण्यात आली.
या यात्रेमध्ये घरोघरी जावून माती व तांदूळ संकलित करण्यात आले. देशासाठी वीर बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मरण यामुळे विद्यार्थ्यांना झाले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाअंतर्गत रांगोळी सपर्धा तसेच देशभक्तीपर गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!