टाकवे बुद्रुक:
इंगळूण ता.मावळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व महादेवी माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला .
१ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या दिवसामध्ये पूर्ण भारतभर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्याच अवचित साधून महाराष्ट्र शासन पुणे वनविभाग वनपरिक्षेत्र शिरोता व वनपरिमंडळ  वहानगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  १ ते १० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
  वन्यजीव सप्ताह नक्की काय आणि वन्यजीवांची माहिती व्हावी यासाठी व त्यांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे याविषयी वन्यजीवप्रेमी जिगर सोलंकी यांनी सखोल माहिती दिली. तसेच वन्यजीव सप्ताह व वन्यप्राणीसंवर्धन, जलप्रदूषण या विषयाची जनजागृती व्हावी यासाठी इयत्ता आठवीच्या मुलांनी पथनाट्य सादर केले.
  या कार्यक्रमसाठी वडगाव वनपरिक्षेत्रातील अधिकारी  एस . एस.बुचडे, वनरक्षक एल.सी.वाघापुरे सर ,एन आर मिलके , काजल पाटील ,जयश्री गोंदवले व आर.एस. ढोले
  सरपंच सुदाम.सुपे ,सदस्य लक्ष्मण पाटारे, ग्रामस्थ लक्ष्मण पारिठे, लहू शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन कृष्णा भंडारी  यांनी केले.

error: Content is protected !!