तळेगाव दाभाडे:
टाळ,विणा,मृदंगाचा गजर..ढोल ताशांचा निनाद..आकर्षक रोषणाई…सुबक रांगोळीच्या पायघड्या.. सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नांची ही आरती…मोरया मोरया आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष..असे आनंदी आणि भक्तिमय वातावरणात आपण सर्वच डुंबून गेलो आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती बाप्पा आकर्षक मखरात विराजमान झाले काय आणि आपण त्यांना निरोप दिला काय?हे सगळे आपण महाराष्ट्रात अनुभवतोय आहोत.
आपल्या कुटूबियांच्या समवेत हे आनंदाचे क्षण अनुभवत आहोत.आपल्या पासून शेकडो मैल दूर असलेले आपल्या महाराष्ट्रातील तरूणांनी युरोपात ‘गणपती बाप्पा मोरयाचा ‘जयघोष केला तोही मराठमोळ्या थाटामाटात.स्लोव्हाकिया येथे प्रथमेश विलास हिंगे हा तरूण राहतोय.नोकरीसाठी दूर असलेल्या प्रथमेशने गणेश चतुर्थीला गणरायाचे स्वागत केले.सुशोभित केलेल्या मखरात,बाप्पा विराजमान झाले.
महाराष्ट्रातील सर्व मराठीजणांना निमंत्रित करून त्याने गणरायाची पहिली आरती घेतली आणि प्रसादाचे वाटप केले.
युरोपातील मंडळींनी गणेश स्त्रोत म्हणावी इतकी सुरेल आरती मराठी माणसांनी म्हटली. पाच दिवस आरतीसह धार्मिक कार्यक्रम झाले.
पाचव्या दिवशी वाजत गाजत लाडक्या गणरायाला निरोप दिला,पुढच्या वर्षी लवकर असे साकडे घालून. त्या नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले ह
प्रथमेश हा तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ तालीम मंडळाचा सक्रीय कार्यकर्ता आहे,परदेशातही त्याच्या तील कार्यकर्ता काही स्वस्थ बसू देईना, त्याने परदेशातही गणरायांची सेवा केली याचा आम्हाला अभिमान असल्याच्या भावना प्रथमेशचे वडील विलास ज्ञानेश्वर हिंगे यांनी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!