वडगाव मावळ:
ढोल ताशाच्या गजरात..गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मावळ तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात लाडक्या गणरायासह गौरी मातेला निरोप देण्यात आला. तोही पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालून.
पावसाची संततधार सुरू असतानाच ढोल ताशांचा हजर,टाळ विणा मृदुंगाचा गजर करीत गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. गावागावातील परंपरेनुसार मंदिराच्या प्रांगणात सर्व गावातील गणेशाच्या मुर्ती आणल्या.
तर सुवासिनींनी गौरी मातेला आज निरोप दिला. पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला मंडळाने गौरीला निरोप देताना गाणी गायली.
फुगड्यांचा फेर ही धरला. माहेरवाशीण आलेल्या गौरी मातेची पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. पहिल्या दिवशी तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दिला.दुस-या दिवशी पंचपक्वान्न आग्रहाने खाऊ घातले. आज दहीभाताचा नैवेद्य दाखवून तिलाही निरोप दिला.
तीन दिवसाच्या माहेरवाशीण आलेल्या गौरीच्या स्वागतात आणि आदरातिथ्य करण्यात महिला वर्ग कुठेच कमी पडला नाही. हळदीकुंकू कार्यक्रम झाले. मंगळागौर पारंपारिक खेळ ही झाले. आज गौरी सह गणरायला निरोप देताना मावळ तालुक्यातील इंद्रायणी,अंद्रायणी,पवना,कुंडलिका नद्यांचे आणि ठोकळवाडी,जाधववाडी धरणाच्या तीरावर ‘गणपती बाप्पा मोरयाचा ‘जयघोष झाला. धरणे आणि नद्यांच्या तीरावर सामूहिक महाआरती झाली. प्रसादाचे वाटप करून गौरी आणि गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
निर्माल्य आणि मूर्तीदान हाही उपक्रम खेडोपाडी पोहचला पाहिजे.तसेच सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्त पाणी बचत तसेच नदी आणि धरणे स्वच्छतेचा संकल्प करायला हवा.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन