परमेश्वराचे अस्तित्व
“सुगंध दिसत नाही परंतु  त्याचा वास मात्र येतो,
त्याचप्रमाणे …..देहातील ईश्वर दिसत नाही पण “हृदयात त्याचा वास असतो”.
वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की, ….
परमेश्वराला सर्वांनाच पाहता येणे शक्य आहे.
परमेश्वर “सत्य” आहे म्हणजे “सातत्याने” आहे. तो नाही असे कधी होत नाही.
परमेश्वर सत्य म्हणजे, …..
सतत, अखंड, अजर, अमर आहे.
“परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती नाही” हे जीवनविद्येने आवर्जून सांगितले आहे.
परमेश्वराचे सत् स्वरूप म्हणजे “चैतन्य,” दुसरे स्वरूप म्हणजे “चैतन्यशक्ती!
म्हणून सत् असं जे आपण म्हणतो ते सत्य, सातत्य ते कसे? “चैतन्याचा विराट सागर या अंगाने म्हणजे “सत्”!
हे चैतन्य अफाट, अचाट , अपरंपार, अपार, Limitless, Endless, Infinite (अनंत) आहे. याला मर्यादा कुठे नाहीच. त्याला आदी नाही व अंत नाही. असे हे परमेश्वराचे स्वरूप आहे.
हे चैतन्य  सर्व वनस्पती, प्राणी, पशू , पक्षी, दगड-धोंडे, पाणी सर्व ठिकाणी आहे.
या संदर्भात डाॕ. मर्फी म्हणतात, –
*”You are the son of infinite life, which knows no end and you are a child of eternity. Life is self renewing, eternal and indestructible and is the reality of all men. You live forever because your life is “God’s life”.*
या ठिकाणी  लक्ष वेधायचे आहे ते म्हणजे,
“You are a child of eternity”*म्हणजे “सत्ता,  सातत्य, सत्य”.
चर आणि अचर या सगळ्या ठिकाणी हे सच्चिदानंद स्परूपात आहे. *जे डोळ्यांना दिसत नाही परंतु ते अनुभवता येत नाही असं मात्र नाही.
म्हणून काही गोष्टी डोळ्यांना दिसतात पण प्रत्यक्षात नसतात. उदा. इंद्रधनुष्य, मृगजळ.
थोडक्यात, ……
जे दिसतं ते असतं असं नाही आणि जे असतं ते दिसतं असं पण नाही.”हवा” आहे पण दिसत नाही पण नाक धरले की हवेचा साक्षात्कार तात्काळ, हवेचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट दिसलीच पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे.
सद्गुरू श्री वामनराव पै
         (सच्चिदानंद स्वरूप भाग ०१)

error: Content is protected !!