लोहगड घेरेवाडीत पुस्तकांची दहिहंडी
पवनानगर:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घेरेवाडी येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने पुस्तक हंडी (दहीहंडी) चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमध्ये पारंपरिक संस्कृती जतनाबरोबरच वाचन संस्कृती रुजविण्याचा अनोखा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात आला. पारंपरिक दहीहंडी सोबतच दोरीवर विविध गोष्टींची व अवांतर वाचनांची पुस्तके लावण्यात आली होती.
प्रत्येकाने आपल्या आवडीचे पुस्तक लुटण्यासाठी प्रयत्न करायचा व ते मिळवायचे. विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने सन उत्सव साजरा करण्यासोबतच मूल्य रुजवणुक करण्यासाठी शाळेचे शिक्षक बाबासाहेब काळे व प्रियदर्शन भालेराव हे सदैव प्रयत्नशील असतात.
या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले यांच्या हस्ते झाले. प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रिता विखार, उपाध्यक्ष प्रमिला मरगळे, कविता विखार, नरेश मढवी, अंगणवाडी सेविका व सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी पुस्तक हंडी (दहीहंडी) उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
- महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करतील – सुनील शेळके
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला लाखोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज
- संविधानाला धोक्यात आणण्याचे काम काँग्रेसने केले: खासदार बृज लालजीपिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
- बापूसाहेब भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शब्दवेल दिवाळी अंक बोलीभाषा विशेषांकाचे प्रकाशन