विद्यार्थ्यांनी लुटला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद
पिंपरी:
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीतून गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली पाटील यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात सुमारे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद लुटला.

सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांनी उपक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी निर्माण केलेल्या गणेशमूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.

error: Content is protected !!