तळेगाव दाभाडे:
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने रोटरी सिटी परिवारातील प्रत्येक शिक्षकाच्या निवासस्थानी जाऊन सन्मानचिन्ह व मिठाई देऊन त्या मेंबरच्या परिवारासमवेत शिक्षक दिन साजरा केला.
रोटरी सिटीचे अध्यक्ष सुरेश शेंडे, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, संजय मेहता,संतोष परदेशी,विश्वास कदम सुनंदा वाघमारे,संजय वाघमारे यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या उपक्रमातून रोटरीयनने कौटुंबिक स्नेहभाव अधिक दृढ केला.
भगवान शिंदे,रघुनाथ कश्यप,शरयू देवळे,संगीता शिरसाट, मधुकर गुरव,दशरथ ढमढेरे, कमल ढमढेरे,रितेश फाकटकर, वर्षा खारगे,चेतन पटवा या शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचे काम करताना रोटरी सिटी मध्ये प्रत्येक उपक्रमात योगदान देत असतात अशा रोटरी परिवारातील शिक्षकांचा हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
- विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्या १० व्या वर्धापन दिन उत्साहत
- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने पहिला ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ जाहीर
- केशवनगर परिसरात नवीन पाण्याची टाकी बांधकामास सुरुवात
- टाकवे येथील मित्रांनी १८ वर्षांनी एकत्र येऊन थंडीत वाटले गोरगरिबांना स्वेटर
- ब्राम्हणोली व वारु गावातील ग्रामस्थांसाठी रोटरी क्लब आयोजित मोफत आरोग्य शिबिर