‘गोविंदा रे गोपाळा…… इंदोरीतील चैतन्य इंटरनेशनल स्कूल (सीबीएसई) येथे  दहीहंडीचा उत्साह
इंदोरी:
चैतन्य चॅरिटेबल फाउंडेशन संचालित चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) इंदोरी येथे  कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा व रंगभूषा केल्या होत्या. छोट्या गटातील मुले कृष्ण व राधेच्या  पारंपारिक वेशभूषेत आली होती.

दहीहंडीचा व रास – गरब्याचा मनमुराद आनंद घेतला.  कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले देखावे (mannequine acts), यामध्ये अग्नी , जल , वायू  आणि पृथ्वी अशा चार गटांनी प्रामुख्याने श्रीकृष्ण जन्म , कालिया मर्दन,श्रीकृष्ण- सुदामा भेट  व गोवर्धन पर्वत असे अप्रतिम देखावे सादर केले.

यानंतर  श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  भगवान शेवकर व संस्थेच्या सचिव  राधिका  उपस्थित होत्या. श्रीकृष्णाची आरती आणि भजन यामुळे सर्व वातावरण कृष्णमय झाले होते.

त्यानंतर शाळेच्या मैदानावर दहीहंडी बांधण्यात आली. विद्यालयातील चारही गटांनी क्रमाने दहीहंडी फोडली. संघटन उत्साह, उत्कंठा, थरार इत्यादी संमिश्र भावनांचा अनुभव उपस्थितितांनी अनुभवला. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आजचा कार्यक्रम सम्पूर्ण झाला.

प्राचार्या  जेसी रॉय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,शालेय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या सुयोग्य व्यवस्थापनामुळे व नियोजनामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शेवटी वंदे  मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!