‘ संकल्प दूरदृष्टीचा – सर्वागीण विकासाचा ‘ राष्ट्रवादीच्या
दौऱ्याला मावळात प्रतिसाद
तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांचा पुढाकार
वडगाव मावळ:
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गावनिहाय संवाद दौरा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्य्क्ष गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी बैठका होऊन गावातील विकास कामे आणि संघटनात्मक कामाचा आढावा या बैठकीतून घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात आंदर मावळातील भोयरे येथून या संवाद दौ-याची सुरूवात झाली.
‘ संकल्प दूरदृष्टीचा – सर्वागीण विकासाचा ‘या थीमवर आधारित असलेल्या या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. पहिल्या दिवशी भोयरे,कशाळ,किवळे,इंगळूण,पारीठेवाडी,कुणे,अनसुटे,माळेगाव खुर्द,पिंपरी,माळेगाव बुद्रुक,सावळा या गावातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी राष्ट्रवादीने संवाद साधला.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, कार्याध्यक्ष साहेबराव कारके,ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष
पंढरीनाथ ढोरे,युवकचे अध्यक्ष किशोर सातकर,महिलाध्यक्षा दिपाली गराडे,ग्रामीण ब्लाॅक अध्यक्षा पुष्पा घोजगे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी असवले,प्रवक्ते राज खांडभोर, सरचिटणीस रामदास वाडेकर,आंदर मावळ अध्यक्ष रूपेश घोजगे,युवक अध्यक्ष भारत आडिवळे,जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रकाश पवार,माजी उपसरपंच लहू वाडेकर,सरचिटणीस भानुदास जांभुळकर, सचिव सुशांत बालगुडे,मंगेश जाधव,नवनाथ जाधव, शशिकला सातकर,, रंजना चिमटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी आहे.
गावोगावी घोंगडी बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा होत आहे.
कार्यकर्त्याची ताकद हेच पक्ष संघटनेचे बळ आहे, हे या संवाद दौऱ्यातून दिसून येत आहे. गावपातळीवरील विकास कामांच्या सूचना कार्यकर्ते मनमोकळ्या पणाने मांडीत आहे.सार्वजनिक विकास कामे वैयक्तीक लाभाच्या योजनेच्या सुचना गावपातळीवरील कार्यकर्त्यांनी आग्रहाने मांडलेल्या आहे,त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला. या सर्व दौ-याचा आढावा उपमुख्यंमंत्री अजित पवार व आमदार सुनिल शेळके यांना देणार असल्याचे ही खांडगे यांनी सांगितले.
बुधवारी ता.६ सप्टेंबरला टाकवे बुद्रुक,फळणे,माऊ ,वडेश्वर,नागाथली,वहानगाव,कुसवली ,बोरवली,कांब्रे ,डाहुली ,कुसूर ,खांडी,निळशी या गावांत संवाद झाला.
गुरूवारी ता.७ सप्टेंबरला पारवडी ,राजपुरी ,बेलज ,घोणशेत ,कचरेवाडी ,वाऊंड ,साई ,नाणोली ,नाणे , कोडिवडे या गावांचा दौरा होईल.
- महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करतील – सुनील शेळके
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला लाखोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज
- संविधानाला धोक्यात आणण्याचे काम काँग्रेसने केले: खासदार बृज लालजीपिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
- बापूसाहेब भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शब्दवेल दिवाळी अंक बोलीभाषा विशेषांकाचे प्रकाशन