साई-पारवडी-नाणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी
अश्विनी अतुल काटकर
वडगाव मावळ:
साई-पारवडी-नाणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी
अश्विनी अतुल काटकर यांची बिनविरोध निवड झाली.मावळत्या सरपंच जयश्री हनुमंत वाडेकर यांनी पदाचा राजनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंडलाधिकारी सचिन कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.

सरपंच पदासाठी अश्विनी अतुल काटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कोकाटे यांनी काटकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.काटकर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच,काटकर समर्थकांनी जल्लोष करीत भंडारा गुलालाची उधळण केली.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणूक बैठकीस उपसरपंच सोपान बापुराव काटकर,माजी उपसरपंच व सदस्य नवनाथ दुंदाभाऊ काटकर,विजय जाधव, माजी उपसरपंच व सदस्य मंदा सोपान गाडे, माजी  सरपंच व सदस्य सुर्वणा दिलीप काटकर,माजी सरपंच व सदस्य पल्लवी रामदास वाघुले,सदस्या अर्चना पिंगळे उपस्थित होते.

सरपंच पदी निवड झाल्यानंतर अश्विनी अतुल काटकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवडणूक सहाय्यक म्हणून गावकामगार तलाठी चव्हाण  ग्रामसेवक गणेश आईवळे यांनी काम केले.नवनिर्वाचित सरपंच काटकर यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
सरपंच अश्विनी काटकर म्हणाल्या,” उपसरपंच सोपान काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध झाली.बिनविरोध निवडीसाठी आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे सहकार्य लाभले मी सर्वाची आभार आहे. साई-पारवडी-नाणोली ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी मी कटिबद्ध आहे. या तिन्ही गावातील सार्वजनिक विकासासाठी प्रयत्नशील राहील. सार्वजनिक विकास कामे आणि लाभाच्या योजना मिळवून देण्याचा प्रयत्न असेल.
माजी सरपंच एकनाथ काटकर,अंकुश काटकर,माजी उपसरपंच एकनाथ वाडेकर,माजी उपसरपंच गिरिष सातकर,माजी उपसरपंच कविता टेकळे, माजी उपसरपंच, प्रसाद सातकर ,पोलीस पाटील हनुमंत वाडेकर,पोलीस  पाटील उमेश काळोखे, पोलीस पाटील अरुणा काटकर ,पोलीस पाटील सोपान गाडे,रामदास वाघुले,दुंदाभाऊ काटकर,गणपत ब.काटकर,सुनिल काटकर,पंढरीनाथ काटकर,रमेश काटकर,
मनेष काटकर,बाळु काटकर,भरत काटकर,गणेश काटकर,शंकर भालेराव,शिवराम वाडेकर,बबन वाडेकर,प्रदीप काटकर,सखाराम टाकवे,अक्षय काटकर,सिताराम काटकर,विलास काटकर,विकास टेकळे, आकाश काटकर, अर्जुन काटकर ,करण काटकर, भोलेनाथ काटकर, विशाल काटकर,भोला काटकर,अर्जुन काटकर,लहू काटकर,पप्पू काटकर, अमित काटकर,दत्ता वाजे, निलेश वाघोले यांनी नवनिर्वाचित सरपंच काटकर यांचे अभिनंदन केले.
यापूर्वी या परिवारातील एकनाथ काटकर यांनी सरपंच भूषविले तर कै.शैला अंकुश काटकर या उपसरपंच होत्या. आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे सरपंच अश्विनी काटकर यांनी ‘ मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन ‘शी बोलताना सांगितले.

error: Content is protected !!