तीस वर्षांनी झाली गुरूशिष्यांची भेट
गुरुजींचा सेवानिवृत निमित्त सत्कार
मारूंजी:
ते सगळे मारूंजीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकले.जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळेने त्यांना लिहायला अन वाचायला शिकवले.१९९२ साली ते सातवी इयत्तेत शिकत होते. आज तीस वर्षानंतर त्यांची आणि वर्गशिक्षकांची भेट झाली, ती शिक्षकदिनाच्या पूर्वेला.ज्या गुरूजींनी ज्ञानाचे धडे आणि आत्मविश्वास शिकवला, ते धोंडिबा केरबा केसरकर गुरूजी सेवानिवृत होत आहे.त्यांच्या सेवानिवृती निमित्त गूरूशिष्यांची भेट घडून आली.
विद्यार्थी आणि गुरुजी यांच्या भेटीने तीस वर्षाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. धोंडिबा केरबा केसरकर गुरूजी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कल्पना सावंत,नवनाथ साठे, दत्तात्रय बुचडे, भारती वाजे, प्रभाकर शिंदे, मारूती शिंदे, जयश्री शितोळे, सुरेखा इंगवले,सुमन काटे, नारायण बुचडे, नितीन बुचडे, सुर्वणा कोळी, वंदना ढोरे,रूपेश निकम, दशरथ जगताप,रेखा कांबळे, बाळासाहेब बुचडे या माजी विद्यार्थ्यानी छोटेखानी समारंभ घडवून आणला,आणि तीस वर्षाचा काळ गुरूजी आणि विद्यार्थी यांच्या डोळया समोरून तरळून गेला.
जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा गावापासून थोडी दूरच होती.शाळेची इमारत साधी कौलारू असली तरी शाळेचे मैदान  भव्य होते. या मैदानात प्राथमिक शाळेचे विद्यार्थी मनसोक्त खेळायचे,बागाडाचे,जितका धिंगाणा वर्गात घालायचे तितकाच
खोखो,कबड्डी,लांबउडी,उंचउडीचा सराव ते मैदानात करायचे. ३६० विद्यार्थ्यांना ७ शिक्षक शिकवायचे,या सात जणात १९९० साली केसरकर गुरूजी सहभागी झाले.शाळेच्या मैदानाच्या बाजूला देशी झाडे ही होती. केसरकर गुरूजींना ज्ञानदाना बरोबर खेळाची आवड होती,त्यांनी ही आवड मुलांमध्ये रूजवली,अर्थात मारूंजी मुलेही खेळकर आणि खोडकर होती.
शिक्षण आणि नाविन्यपूर्ण खेळाच्या सरावातून या विद्यार्थ्यानी
सलग दहा वर्ष तालुका आणि  जिल्हा पातळीवरील बक्षीसे पटकावली.शाळेतील खोडकर पणा,वर्गातली दंगामस्ती, प्रार्थना आणि कवितेचे सूर,वाक्प्रचार,म्हणी,गणिताची आकडेमोड आणि तोडकेमोडके येणारे इंग्रजी या सर्व आठवणींना या सोहळ्यात उजाळा मिळाला. केसरकर सर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर त्यांचे गाव तीस वर्षांनी या मुलांनी फोन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले,हे ऐकून सरांना विद्यार्थाने कौतुक वाटले.
लहानपणी ज्या  मुलांना पाहिलं ती मुलं कर्तृत्वाने खूप मोठी झाली, प्रगतीची माहिती सगळी मुले सांगत होती,हे.ऐकून गुरूजींचे मन प्रसन्नही होत होते,आणि अभिमान ही वाटत होता. केसरकर गुरूजींच्या या सन्मान सोहळ्याला त्यांची पत्नी सुनिता केसरकर , मुलगा गौरव,, मुलगी शिवानी, स्मिता, नातू श्रीअंश, नात प्रनिशा ,पुतण्या आकाश ही  उपस्थित होता. केसरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भारती वाजे यांनी  स्वागत केले. स्नेह भोजनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.
धोंडिबा केसरकर गुरूजी म्हणाले,” तीस वर्षांपूर्वी जे प्रेम ,जो जिव्हाळा होता. तोच आता या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.मारुंजी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रेम व पालकांचा विश्वास मिळाला. तो आजही मनात तसाच घर करून आहे. यांच्या मुळे मी घडलो.पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला .आणि आज इतक्या वर्षांनी माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमा इतक्या उत्साहाने आदराने आणि प्रेमाने केला. हीच माझ्या कामाची खरी पावती आहे.माझ्या आनंदाच्या अनेक आठवणी पैकी ही एक आठवण कायमच मनात घर करून राहील.
गोडुंब्रेच्या माजी सरपंच कल्पना अनिल सावंत म्हणाल्या,” आमच्या नेतृत्व गुणाचा विकास शाळेच्या मैदानावर झाला. आमची कबड्डी आणि खोखो ची टीम तालुका आणि जिल्हा पातळीवर गेली याचे श्रेय आमच्या केसरकर गुरूजींना. आमच्या शाळेने आम्हाला घडविले शिकवले. तीस वर्षांनी झालेल्या या सोहळ्यात आम्हालाही आमची सुख दु:ख मोकळ्या पणाने बोलता आली. गुरूशिष्य परंपरेचे महत्व आपण जाणतोच.याच परंपरेला अनुसरून तीस वर्षांनीही सरांचे मार्गदर्शन आम्हाला प्रेरणा घेऊन गेले.आजचा सोहळा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा,अभिमानाचा वाटला.

error: Content is protected !!