जीवनाकडे पाहण्याची नविन दृष्टी
निसर्गाचे नियम
जगातील सर्व धर्मांतील सर्व लोकांचा असा गैरसमज आहे की, परमेश्वर (God) विशिष्ट परिस्थितीत व विशिष्ट कारणासाठी कृपाळू किंवा निष्ठुर होऊन माणसावर कृपा किंवा कोप करीत असतो व त्याप्रमाणे माणसाला सुख किंवा दुःख प्राप्त होत असते.
वास्तविक, असा प्रकार मुळातच नसतो, हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. परमेश्वर माणसाच्या जीवनात कधीही ढवळाढवळ करीत नाही किंवा हस्तक्षेप करीत नाही किंवा कुणाच्याही बाबतीत तो Partiality किंवा Favouritism म्हणजे पक्षपात करीत नाही. मानवी जीवनात निसर्गाचे नियम निर्णायक (Deciding Factor ) ठरत असतात.
या सत्याचे ज्ञान मानव जातीला लवकर होणे आवश्यक आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया (Action and reaction are equal and opposite) हा निसर्गाचा सर्वांत महत्त्वाचा नियम असून या नियमाप्रमाणे मानवी जीवन साकार होत असते. या नियमाला निष्फळ करण्याचे सामर्थ्य कोणाही माणसाला नाही, किंवा खुद्द परमेश्वराला सुद्धां नाही.
वृक्षाच्या बीजामध्येच वृक्षाचे फळ असते त्याप्रमाणे माणसाच्या कर्मातच त्या कर्माचे फळ असते. जमिनीमध्ये पेरलेल्या वृक्षाच्या बीजावर पाण्याचे सिंचन केल्याने वृक्ष बहरतो आणि फळतो, त्याच प्रकाराने माणसाकडून जे चिंतन घडत असते त्याप्रमाणे माणसाचे जीवन फुलते व फळते. याचाच अर्थ असा की, माणूस जे कांही विचार-उच्चार-आचार या तीन स्तरावर चांगले किंवा वाईट कर्म करील, तेच कर्म बुमरँग होऊन त्याच्याकडे परत येईल.
माणसाने जर दुसऱ्यांचे भले केले किंवा दुसऱ्यांना सुखी करण्याचे प्रयत्न केले तर तेच सुख बुमरँग होऊन त्या माणसाकडे परत येईल व त्याला सुखी करून त्याचे भले करील. याच्या उलट जर माणसाने दुसऱ्यांचे वाटोळे केले किंवा दुसऱ्यांना दुःखी करण्याचे प्रयत्न केले तर तेच दुःख बुमरँग होऊन त्याचे वाटोळे करील. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करणे इष्ट वाटते.
जर एखादा माणूस पांच, दहा किंवा शंभर लोकांच्या सुखाला किंवा दुःखाला कारणीभूत ठरत असेल तर तेच सुख किंवा दुःख त्याच प्रमाणात म्हणजे पांच पटीने किंवा दहा पटीने किंवा शंभर पटीने गुणाकारीत स्वरुपात बुमरँग होऊन त्याच्याकडे परत येईल.थोडक्यात, जीवनामध्ये माणसे जी बरी वाईट कर्मे करतात,ती सर्व कर्मे निसर्ग नियमाना कार्यान्वित (Activate) करतात.
त्या सर्व कर्मांना निसर्ग शक्तीकडून बरा वाईट प्रतिसाद मिळून त्यांच्या जीवनात सुख-दुःखांना कारणीभूत ठरत असतात.या सत्याचे भान ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे.
*सद्गुरू श्री वामनराव पै
- महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करतील – सुनील शेळके
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला लाखोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज
- संविधानाला धोक्यात आणण्याचे काम काँग्रेसने केले: खासदार बृज लालजीपिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
- बापूसाहेब भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शब्दवेल दिवाळी अंक बोलीभाषा विशेषांकाचे प्रकाशन