कान्हे मावळ:
येथील दि सुप्रीम इंडस्ट्रिज लिमिटेडचे कामगार  कंपनीतील आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीला पुढे आले आहे.त्याच्या आजारपणाच्या उपचारासाठी त्यांनी आपला एक दिवसाचा पगार दिला आहे.

‘ मदत नव्हे कर्तव्य ‘ या संकल्पनेतून आपल्या आजारी कामगार तुकाराम सांगळे या बंधुला आर्थिक मदत व्हावी म्हणून सर्व कामगार बांधवांनी आपला एक दिवसाचा पगार कपात करून त्या सर्व रकमेचा धनादेश त्याच्या मुलाकडे सुपूर्द केला.

स्व.विश्वनाथराव भेगडे माथाडी व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष लहु शेलार व शांताराम टकले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक युनियन अध्यक्ष रामदास सतकर, अशोक साबळे, सुनील शिरसठ, बाबुराव सातकर, संभाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन कामगारांशी संवाद साधला व ही मदत दिली.

कंपनी व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी शिवानंद बालगी , वाघमारे , प्रभातकुमार  यांचे  सहकार्य लाभले. युनिट अध्यक्ष रामदास सातकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!