इंदोरी:
येथील सीबीएसईच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये
लोकनृत्या मधून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
भारतीय परंपरा ही पुरातन असून ती विविध कलागुणांनी नटलेली आहे.ही नृत्य परंपरा जोपासण्याचे काम चैतन्य इंटरनॅशनल स्कूल करीत आहे.
विद्यालयाच्या प्राचार्य जेसी यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.परिक्षण सादळकर,पुनम शेवकर, अनिता जाधव यांनी केले. अग्नी, जल,वायू,पृथ्वी या नावाने चार गट करण्यात आले होते. या चारही गटाने अनुक्रमे संबलपुरी ओड़िया लोकनृत्य,महाराष्ट्रीयन गोंधळ लोकनृत्य, भांगडा पंजाबी लोक संस्कृती, राजस्थानी पारंपारिक काल बेलिया
नृत्याचे दर्शन घडविले.
विद्यार्थ्यांनी आपापल्या गटांमध्ये पारंपारिक पद्धतीने रंगभूषा आणि वेश परिधान केला होता . या नृत्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख झाली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पालक वर्ग आणि विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
पालकाचे प्रतिनिधित्व करताना सादळकर मॅडम म्हणाल्या कि विद्यार्थ्यांच्या सूप्तकलागुणांना प्रोत्साहन देण्याचे शाळा करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रज्ञेश पित्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.