कैवल्यधाम च्या दोन कोर्सेस च उदघाट्न डॉ भूषण कुमार उपाध्याय यांच्या हस्ते
प्रतिनिधी : श्रावणी कामत
लोणावळा :
कैवल्यधाम योग संस्थेमधील गोवर्धनदास सेक्सेरिया योग आणि सांस्कृतिक  संश्लेषण महाविद्यालया मध्ये post graduate diploma in yoga Education 2023-24 कोर्स तसेच diploma in yoga therapy 2023-2025 या दोन कोर्सेचे उदघाटन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे डॉ. भूषण कुमार उपाध्याय, IPS महाराष्ट्र, DG police and commandant ganral, HG, MS, Mum, M. A. Sanskrit (gold medalist )ph. D. Phonestics, writer, poet, and mahaprana yoga practitioner यांच्या शुभ हस्ते कैवल्यधाम चे मुख्य अधिकारी मानद सचिव श्री सुबोध तिवारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले .

या वेळी योग महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ बंदिता सतपते, प्रो. आर. के. बोधे, डॉ शरदचंद्र भालेकर व्यासपीठावर उपस्थित होते.पोलीस बँड पथकाने डॉ भूषण कुमार उपाध्ययचे बँड द्वारे स्वागत केले..कार्यक्रमांची सुरवार शांती व दीप प्रज्वलन ने करण्यात आले. डॉ भूषण कुमार उपाध्याय यांचा सत्कार अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी केले.

डॉ भूषण कुमार उपाध्याय यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि तणावमुक्ती साठी योगा सारखे दुसरे साधन नाही.. तसेच नवीन विद्यार्थ्यांचे शाब्दिक स्वागत सुबोध तिवारी यांनी केले
PGDYED ha 9 महिन्याचा कोर्स असून त्यामध्ये देशातील विविध राज्यामधील 53विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्रवेश घेतला आहे आणि diploma in yoga therapy हा दीड वर्षाचा ( 10 प्रवेश मर्यादित ) कोर्स असून 9 विद्यार्थ्यानी प्रवेश घेतल आहे.

एक आंतरराष्ट्रीय विद्या र्थीनिचा समावेश आहे. सदर कोर्सेस हे योग क्षेत्रातील उच्च पदवीधर कोर्सेस असून याचा विद्यार्थाना पुढे योग प्रशिक्षक, योग थेरपी शिक्षक होण्यासाठी निश्चितच लाभ होणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे मानद सचिव श्री सुबोध तिवारी यांनी केले होते. सूत्रसंचालन डॉ रजनीश शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शरदचंद्र भालेकर यांनी केले.

error: Content is protected !!