तेवीस वर्षांनी अनुभवले शाळेतील दिवस
टाकवे बुद्रुक :
येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९९९ -२० बॅचचे विद्यार्थ्यां तब्बल २३ वर्षांनी एकत्र आले.तेवीस वर्षानी एकत्र आलेल्या सवगंडयांनी सुख दु:खाच्या अनेक घटनांना उजाळा दिला.
पुणे जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी स्थायिक असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आवर्जून उपस्थित होते. सर्वांच्या प्रवासाच्या सोयीनुसार सभागृहाचे स्थळ निवडण्यात आले होते. मेळाव्यासाठी शिक्षकांना निमंत्रित केले होते. शिक्षकाना सन्मानपूर्वक आमंत्रण दिले होते.
कार्यक्रमाची रूपरेषा ही शाळेतील दैनंदिन उपक्रमांवर आधारित होती. राष्ट्रगीत, दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी शाळेतील जीवनातील अनुभव कथन करताना अनेक जुन्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
दरम्यान सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ देऊन सर्व सन्माननीय गुरुवर्यांचा सन्मान सोहळा पार पडला. बॅचचे विद्यार्थी आज वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत, हे पाहून, ऐकून शिक्षक मंडळी अगदी आनंदाने भारावून गेले होते. शिक्षक अनेक पिढ्या घडविण्याचे काम करत असतात. शालेय शिक्षण देता देता शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे धडे यशस्वीपणे देत आले आहे. माणूस घडविण्याचे कार्य हे शिक्षकांमार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने घडले आहे.
टाकवे हायस्कुलमधील हे सगळे शिक्षक खरोखरच तन – मन – धनाने काम करत असतात. अनेक यशस्वी पिढ्या घडविण्याचे कार्य सदर शिक्षक करत आहेत, हे आजच्या या स्नेह मेळाव्यानिमित्ताने अनुभवायला मिळाले.
स्नेह मेळाव्याला उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांना वैयक्तिक मिसळता यावे, विचारपूस व्हावी, खुशाली कळावी यासाठी गप्पा मारता याव्यात त्यासाठी गोल राउंड करून एकमेकांबद्दल विचारपूस करत होते व मनसोक्त गप्पा मारताना अनेकांनी जीवनातील किस्से सांगितले.
सर्व प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केल्यानंतर आभार प्रदर्शन करून वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मेळाव्याच्या नियोजनामध्ये ममता जैन, साधना काळभोर, सदानंद पिलाने, संतोष जांभुळकर, शशांक खोडे, चंद्रकांत असवले आणि गणेश जांभळे यांनी विशेष सहभाग घेतला.
रांगोळी रेखांकन हे शालेय जीवनातील संकल्पनेशी निगडित होते.शालेय आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपुलकीचं, प्रेमाचं, शाबासकीचं, गाठोडं सोबत नेलं, एवढं मात्र नक्की असे ममता जैन म्हणाल्या.
शिक्षक एस.बी.जाधव , सोपान असवले,कुंभार,नारायण असवले ,पिराजी वारिंगे ,एम. के. जाधव , भवार , आनंद जांभुळकर , माजी विद्यार्थी संतोष जांभुळकर, गणेश महाराज जांभळे, सूर्यकांत कराळे, राम परदेशी, शशांक खोडे,विशाल मोरे,चंद्रकांत असवले,अमित पवळे सदानंद पिलाने,रोहिदास कोद्रे, सोमनाथ जाधव, दत्तात्रेय लंके,विश्वास मालपोटे, बुधाजी जागेश्वर, नवनाथ मोढवे,योगेश शिंदे,रवींद्र शिंदे ,माजी विद्यार्थिनी मनीषा मालपोटे ,साधना काळभोर, भारती रणपिसे, ज्योत्स्ना आडकर,रोशन चोरघे ,सारिका येवले,अबोली मारणे,अरुणा काटकर,अनुराधा कुंभार, ममता ओसवाल , ताई मालपोटे , शर्मिला गायकवाड,अनिता लामगण उपस्थित होते.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष