लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिधा संकलन
पिंपरी:
साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि सामाजिक समरसता मंच यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवातील भोजनव्यवस्थेसाठी लागणारा शिधा संकलित करून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीकडे सुपुर्द करण्यात आला.
यावेळी अण्णाभाऊ साठे महोत्सव समितीचे अध्यक्ष अण्णा कसबे, माजी अध्यक्ष मनोज तोरडमल, समरसता गतिविधी जिल्हा सहसंयोजक नरेंद्र पेंडसे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, अमोल देशपांडे, महेंद्र बोरकर उपस्थित होते.
गिरीश प्रभुणे म्हणाले, “संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांतून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा यांच्यावर शाब्दिक प्रहार करीत समाजजागृती केली; तर तुकाराम भाऊराव साठे अर्थात अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक समरसता प्रस्थापित केली!” असे विचार मांडले.
शिधा संकलनासाठी तानाजी साठे, अतुल आडे तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आणि सामाजिक समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शाहीर आसराम कसबे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस