तळेगाव स्टेशन:
तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या नर्सिंग जीएनएम कोर्स करणा-या  विद्यार्थिनींना प्रत्येकी पंचवीस हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.

नेव्हीच्या संरक्षण विभागातील  कॅप्टन अनिरुद्ध बापट आणि मेजर जनरल अभिजीत बापट यांनी आजोबांच्या स्मृती पित्यर्थ ही शिष्यवृत्ती दिली. तळेगाव जनरल हॉस्पिटल अ‍ॅण्ड काॅन्व्हलसंट होमचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्यवृत्ती प्रदान सोहळा पार पडला. बापट यांचे आजोबा डॉ. भास्कर यशवंत परांजपे  १९३० च्या दशकात डॉ. भाऊसाहेब सरदेसाईच्या समवेत नेत्र रुग्णसेवेसाठी दर रविवारी मुंबईहून तळेगावला यायचे.

आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  बापट बंधूंनी दहा लाख रुपये मुदत ठेवी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या खात्यात जमा केल्या आहे. या ठेवीतील व्याजातून जमा होणाऱ्या रकमेतून दरवर्षी नर्सिंग स्कूलच्या आर्थिक दृष्ट्या कमकुवत पण हुशार असणाऱ्या विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप देण्यात येते.

जनरल हॉस्पिटल संचलित जीएनएम नर्सिंग स्कूलच्या प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या संयुक्ता गंगारकर आणि द्वितीय वर्ष पूर्ण केलेल्या संचिता कुडेकर यांना प्रत्येकी पंचवीस हजार शिष्यवृती देण्यात आली. उद्योजक शैलेश शहा,डाॅ. शाळिग्राम भंडारी,सुखेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.  मोनालिसा पारगे,क्रिस्तीना रणभिसे यांच्यासह अन्य स्टाफने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!