वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात सर्वाधिक बीज संकलन करणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानोली तर्फे चाकण    या शाळेला बहुमान मिळाला आहे.

जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्था मावळच्या वतीने मावळ तालुक्यातील सर्वाधिक बीज संकलन केलेल्या शाळेचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांकाने बीज संकलन केलेल्या जि प शाळा नानोली तर्फे चाकण व त्यातील सर्व बीज संकलन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व  क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी व  प्रशस्तीपत्र देऊन यथोचित असा सन्मान करण्यात  आला.

प्रथम-श्रद्धा संतोष काळे,द्वितीय- आर्या साहेबराव लोंढे,
तृतीय- अनुजा शंकर लोंढे  असे क्रमांक या विद्यार्थीनी पटकाविले.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे… या उक्तीप्रमाणे जगद्गुरु, संत श्रेष्ठ तुकोबा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्ष हेच आपले खरे जीवन आहे .त्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणे हे महत्त्वपूर्ण कार्य या वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्थेने हाती घेतलेले आहे.

त्यानिमित्ताने नानोली व नानोली परिसरामध्ये अधिकाधिक झाडे लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी नानोली तर्फे चाकण ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मोनिका शिंदे म्हणाल्या ,” या संस्थेमार्फत लागवड केलेल्या सर्व झाडांचे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या वतीने योग्य प्रकारे जतन केले जाईल व परिसरात वृक्ष संवर्धन आम्ही करून, पर्यावरणचा समतोल राखण्याचे काम आमचे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक करतायेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.

           याप्रसंगी वसुंधरा पर्यावरण संवर्धन संस्थेचे *किशोर गराडे यांनी मनोगतामध्ये तालुक्यातील सर्वाधिक बीज संकलन केल्याबद्दल जि प शाळा नानोलीचे विशेष कौतुक केले व इथून पुढे अधिकाधिक वृक्ष या गावात देण्याचा मनोदय व्यक्त केला गेला.
          
      या सुंदर अशा पर्यावरणपूरक कार्यक्रमाचं साठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मोनिकाताई शिंदे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनीषाताई बोराडे, ग्रा.सदस्य सोनलताई काळे, ग्रा.सदस्य शुभांगीताई लोंढे, व्यवस्थापन समिती सदस्या मायाताई मखामले, ग्रामसेवक अहिरे भाऊसाहेब व गावचे युवा नेते स्वप्निल शिंदे, *पर्यावरण मित्र किशोर गराडे  उत्तम शिंदे अविनाश गोपाळे व अंकुश भोकसे* आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.        

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते तुकारामजी केदार सरांनी केलं प्रास्ताविक व अध्यक्ष निवड शाळेचे मुख्याध्यापक बबनराव कोळेकर यांनी केले व आभार श्री. हरिभाऊ आडकर यांनी मानले.

error: Content is protected !!