पुणे:
येथील टेलस ऑर्गनायझेशनच्या वतीने विद्यार्थ्यांशी पर्यावरण संवर्धनासाठी संवाद साधत चर्चा केली.टेलस ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट , क्लायमेट रियालिटी लीडर राधिका कुलकर्णी यांनी छत्रपती संभाजी विद्यालय कोथरूड येथील शाळेत तील विद्यार्थ्यांसह  पर्यावरण संवर्धन तसेच प्लास्टिक प्रदूषण विषयी संवाद साधला.

लोकेश बापट यांनी  निसर्ग संवर्धनाची खरच गरज असते का ? याविषयी बोलताना निसर्ग म्हणजे काय?  त्याची उत्पत्ती कशी झाली? निसर्गाचे कार्य  कसे चालते?  त्याला मानवाची खरच गरज आहे का? मानवाच्या अति हस्तक्षेपामुळे निसर्गाचा ऱ्हास कसा होत गेला व भविष्यात आपल्या पिढीने त्याच्या रक्षणासाठी आता काय केलं पाहिजे याविषयी चर्चा केली.

राधिका कुलकर्णी यांनी जागतिक हवामान बदलाचे धोके व त्याचे परिणाम मानवी जीवनावर तसेच  निसर्गावर होत आहेत. त्याचा सामना कसा केला पाहिजे.  जलसंवर्धन किती महत्त्वाचे आहे .त्याचे कसे भविष्यात फायदे असतील.  पाण्याचा वापर  कशा पद्धतीने केला गेला पाहिजे. प्लास्टिक प्रदूषणाचे  दुष्परिणाम या विषयाची माहिती विद्यार्थिनी दिली .
  यावेळी छत्रपती संभाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता गीते तसेच शिक्षिका अंजली कुलकर्णी अनुराधा चोरगे आणि संस्थेचे राजीव कुबेर यांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!