वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना नाट्य क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी,नाट्य क्षेत्राविषयी आवश्यक असणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवली जावीत यासाठी बालरंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील वर्षीपासून तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
मावळ तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली नाट्य क्षेत्राची आवड वृद्धिंगत करू शकतात तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे केंद्र नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे संचलित नवीन समर्थ विद्यालय विष्णुपुरी तळेगाव दाभाडे हे आहे आपल्या पाल्यामध्ये नाट्य क्षेत्र विषयक कौशल्य रुजविण्याची पालकांसाठी ही एक संधी आहे .
तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधावा असेआवाहन प्रभा भारत काळे बालरंगभूमी परिषद ,पुणे जिल्हा ,कार्यकारणी सदस्य यांनीकेले. ९८२२४९५४७५ या क्रमांकावर आपल्याला संपर्क साधतायेईल. बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित ही स्पर्धा असेल.
नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धेसाठी स्पर्धेचे नियम व अटी आहे. स्पर्धा चार गटात घेतली जाईल.गट-०१–इ.१ली २ री, वेळ-२ ते ४ मिनिटे,गट-२–इ.३ री,इ.४ थी,वेळ-२ ते ४ मिनिटे,गट-०३–इ.५ वी ते इ.७ वी,३ ते ५ मिनिटे,गट-०४–इ.८ वी ९ वी,३ ते ५ मिनिटे असे गट आहे
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व विजेत्यांना ट्रॉफी मिळतील.फॉर्म भरून नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत 30 जुलै राहील. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रवेश फी १५०/- रुपये राहील.तालुका स्तरावरून प्रत्येक गटात प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याची जिल्हा पातळीवरील अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल.जिल्हास्तरावर प्रत्येक गटात अभिनयाचे तीन व उत्तेजनार्थ तीन असे मिळून चार गटात असे प्रत्येकी २४ नंबर काढले जातील.तालुकास्तरीय फेरी २५ जुलैपासून ते १०ऑगस्ट पर्यंत होणार आहेत.जिल्ह्याची अंतिम फेरी व बक्षीस वितरण 13ऑगस्ट रोजी होईल. नाट्यछटेचा विषय वयोगटाला योग्य असावानाट्यछटा म्हणजे एकपात्री कथाकथन किंवा स्वगत नाही. प्राथमिक फेरीत सादर केलेली नाट्यछटा अंतिम फेरीमध्ये सादर करावी लागेल.
तालुकास्तरीय नाट्य स्पर्धेचे केंद्र-नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालय विष्णुपुरी तळेगाव दाभाडे, तालुका मावळ हे आहे.