कामशेत:
शाळेचा माजी विद्यार्थी राहुल पवार यांच्या स्मरणार्थ सांगिसे शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. सांगिसे ता मावळ येथील बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित माध्यमिक विद्यालयात शाळेचा माजी विद्यार्थी राहुल पवार याच्या स्मरणार्थ सर्व विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे मोफत वितरण करण्यात आले.

      ‌पुणे येथील राहुल पवार हा शाळेचा माजी विद्यार्थी मार्च 2014 एस एस सी परीक्षेत या शाळेतून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता.तसेच त्याने 2008-2014 या काळात संस्थेच्या वसतिगृहात निवासी राहून शिक्षण पूर्ण केले. त्याच्या कुटुंबाची तात्कालिन आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने संस्थेने त्याचे शिक्षण मोफत केले होते. तसेच सध्या तो एका आय टी कंपनीत कार्यरत होता.
     
परंतू दुर्दैवाने त्याचे 30 जुन 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूपूर्वी या विद्यार्थ्यांने माध्यमिक विद्यालय सांगिसे या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करावी अशी इच्छा मित्रांकडे व्यक्त केली होती.त्याची पुर्ती  आज या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वितरण करून या मित्रपरिवाराने‌ केली.यासाठी त्याचा भाऊ शरद पवार व सर्व मित्रांनी सहकार्य केले.
     
    कार्यक्रमाप्रसंगी प्रथम राहुल यास शाळेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री अंबादास गर्जे यांनी केले तर आभार श्रीमती सुनिता वंजारी यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष गोकुळजी गायकवाड, सचिव लहू कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर अरनाळे,अनिल शिंदे,सविता शिंदे, दशरथ ढोरे,अमोल आल्हाट यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!