तळेगाव दाभाडे :
शेती ला जोडधंदा म्हणुन  कुक्कुटपालन  व्यवसाय  अतिशय किफायतशिर असुन  शेतकरी बांधवानी  हा व्यवसाय  प्राधान्याने  करावा  असे आवाहन मावळ तालुका पोल्ट्री संघटनेचे अध्यक्ष एकनाथ गाडे  यांनी केले.

       रूडसेड संस्थेच्या वतीने आयोजित  कुकुटपालन  व्यवसाय प्रशिक्षण कायॅशालेच्या  समारोप  समारंभात श्री  गाडे  हे  बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून  पोल्ट्री  उद्योजक  संभाजी केदारी  सुभाष केदारी  सोनबा गोपाळेगुरूजी  हे उपस्थित होते.  या प्रशिक्षणाचे आयोजन  रूडसेड संस्थेचे संचालक प्रविण बनकर यांनी  केले होते.
      
       यावेळी बोलताना श्री  गाडे  म्हणाले की व्यवसाय प्रशिक्षणाने  व्यवसायाची  अचुक  दिशा कळतेआणी व्यवसाय  यशस्वी  होण्यासाठी  मदत होते.
       आपण करीत   असलेला  व्यवसाय  चिकाटी  आणी जिद्दीने    केल्यास व्यवसायास  लवकर  स्थिरता प्राप्त होऊ शकते असे उद्योजक  संभाजी केदारी  यांनी यावेळी सांगितले. यावेळी  उद्योजक  सुभाष केदारी  सोनबा गोपाळेगुरूजी यांनी मार्गदर्शन केले.
      
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशिक्षक  संदिप पाटील यांनी केले . तर प्रशिक्षणाथी संभाजी भोते  ,राहुल  पांडे,जुबेरा शेख यांनी  मनोगते  व्यक्त केली.  सुत्रसंचालन  दिनेश निळकंठ यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रशिक्षक संदिप  पाटील ,हरिष बावचे,  योगीता गरुड, रवी  घोजगे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशिक्षण पुर्ण केल्याबद्दल प्रशिक्षणाथीना प्रमाणपत्राचे  वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!