सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबणार
सोमाटणे:
शिवणे येथील स्वामी विवेकानंद ज्यूनिअर कॉलेज येथे दररोज सात किलोमीटरची पायपीट करीत शिक्षण घेणा-या सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबणार आहे. दररोज या लेकी शिक्षण  घेण्यास पायी येत आहेत. डोणे गावातील मुलीसाठी सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपोलिस च्या सौजन्याने सायकलचे वाटप करण्यात आले.

पायपीट थांबविण्यासाठी पंधरा मुलींना सायकल देऊन मदतीचा हात देण्यात आला. त्याकरिता क्लबचे प्रेसिडेंट शंकर गावडे, सेक्रेटरी महेंद्र परमार ,खजिनदार रामचंद्र माने, activity chairperson ला. भरत इंगवले ,नवनियुक्त झोनChairperson शिरीष हिवाळे, सीनियर ला.अनुप ठाकूर, ला.नागेंद्र, ला.झुनझुनवाला,ला.संदीप पाटील, ला. नितीन काटे,ला.शाम काटे,ला.गव्हाणे,ला.राजे,ला. महेश बारगळे, ला.विश्वजित  बेडगे,चंद्रकांत दरेकर, पुंडलिक दरेकर , यशवंत निम्हण व क्लबचे सर्व लायन्स देणगीदारांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

झोन Chairperson ला.भरत इंगवले म्हणाले,”आता पर्यंत क्लब च्या वतीने ग्रामीण भागात ३०० सायकलचे वाटप केले असून ह्या वर्षी सुद्धा ५१ सायकल देऊन मुलीची पायपीट थांबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

error: Content is protected !!