वडगाव मावळ:
निराधार व्यसनी व्यक्तीस स्माईलचा आधार मिळाला आहे. स्माईलच्या सानिध्यात राहून या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ‘स्माईल ‘येईल असा विश्वास स्टाईलचे सर्वेसर्वा हर्षल पंडीत यांनी व्यक्त केला.

राजेश गणपत कांबळे हा सुशिक्षीत व्यक्ती गेले बरेच महिने केशवनगर मधील मोरया गोसावी बस स्टॉप मध्ये राहत असल्याचे स्माईलचे संस्थापक हर्षल पंडित यांना आढळले. त्यांनी त्याची विचारपूस केली असता तो दारुच्या नशेत आसल्याचे जाणवले.या इसमाला त्याच्या स्वतःच्या अंगावरील कपड्याचेही भान नव्हते. तो बऱ्याच दिवसांपासून उपाशी असल्याचे जाणवले.

हे गृहस्थ बी.कॉम. असून डेल कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. त्याचे संपूर्ण कुटूंब एका कार अपघातात गेल्याचे कळले. त्यानंतर ते व्यसनाधीन झाले नोकरी गेली. गेली आठ वर्षे ते निराधार अवस्थेत भटकत होते. भीक मागून कसेतरी पैसे गोळा करुन दारु पिणे हेच त्याचे दिवसभराचे काम होते.

स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने त्याला आधार देण्याचे ठरविले,आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाले,स्माईल व्यसनमुक्त केंद्रात त्यांच्या चेहर्‍यावर स्माईल येईल अशी आशा आहे. स्माईल मध्ये अनेक निराधार व्यसनी व्यक्तींचा मोफत सांभाळ केला  जातो. त्यांना व्यसनमुक्त करुन समाजात मोलाचे स्थान देण्याचे, स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करते.

राजेश कांबळे यास उत्कृष्ठ ,चांगले व्यसनमुक्त आयुष्य देण्यासाठी त्यांना चिंचवड पोलिसांच्या परवानगीने स्माईल मध्ये आणण्यात आले. या प्रसंगी स्माईलचे प्रकल्प समन्वयक अमोल कुलकर्णी, राहुल बोरुडे व मोरे यांची मदत झाली. हर्षल पंडित यांनी त्या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!