सोमाटणे:


आढे ता.मावळ येथे आढे ग्रामपंचायत , फिनोलेक्स इंडस्ट्रियल लिमिटेड व मुकुल माधव फाउंडेशन वनलेसच्या सहकार्याने सामाजिक विकास  निधीतून पाचशे रोपांची लागवड करण्यात आली.या वृक्ष लागवडीमुळे गाव सुंदर दिसेल.

आंबा अशोक, कांचन, बदाम, बहावा, तामण ही झाडे लावण्यात आली. या उपक्रमामुळे त्या गावातील महिलांना रोजगार मिळेल आणि फळबागांमुळे पंचायतीला वार्षिक उत्पन्नही मिळेल.

या कार्यक्रमास  जितेंद्र जाधव (एमएमएफ),  राजेश दुरगुडे (एफआयएल),  प्रदीप धामणकर (माजी सरपंच), माने (एफआयएल), दिनेश (एफआयएल), पर्वणी (एफआयएल) उपस्थित होते. ),  अमरीश कुमार (एफआयएल), सुभाष ठाकर (पो. पाटील), सुनीता ज्ञानेश्वर सुतार (सरपंच), बाबा हिंगडे (उपसरपंच), संगिता सुतार. (ग्रा. सदस्य) मच्छिंद्र सुतार (ग्रा. सदस्य), पिंटूशेठ तिडके, अंकुश कारके भाऊसाहेब सुतार, सौरभ सुतार उपस्थितीत होते.

सरपंच सुनिता सुतार म्हणाल्या,” वृक्षारोपण काळाची गरज आहे,लावलेल्या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी आम्ही सर्वानी स्वीकारली आहे. सर्वच्या सर्व रोपे वाढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,येत्या काळात गावात हिरवीगार वनराई समृद्ध होईल.

error: Content is protected !!