चमत्कार तेथे नमस्कार
संत-सद्गुरू यांच्याशी चमत्कारांचा संबंध प्राय: जोडला जातो,तो येथपर्यंत की चमत्कार करतात ते संत या कल्पनेवर आज सामान्य समाज स्थिर झाला आहे. वास्तविक वस्तुस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे.चमत्कारांचा संतांशी कांहीही संबंध नसतो.संत चमत्कार करीत नाहीत  चमत्कार करतात ते संत असतात असे नाही.

अहंकाराचा आश्रय घेतल्याशिवाय प्रायःचमत्कार करता येत नाहीत व अहंकाराचा नाश झाल्याशिवाय संतपद प्राप्तच होत नाही.
अहंकार गेला तुका म्हणे देव झाला
अहंकाराचा अंधार जेथे आहे तेथे देवाचा प्रकाश संभवत नाही.म्हणून चमत्कार करणाऱ्यांच्या पाठीमागे ते संत-सद्गुरू म्हणून मागे लागणे हे अडाणीपणाचे लक्षण आहे.चमत्कार व चमत्कार करणारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, स्थूल मानाने ते खालीलप्रमाणे होत

 *१) हात चलाखी करून चमत्कार दाखविणारे;*

 *२) नजरबंदी करून चमत्कार करणारे;*

 *३) अंतर्मनाला वश करून घेऊन त्याच्यामार्फत चमत्कार घडवून आणणारे;*

 *४) अकस्मात अपघात उत्तर व मेंदुला मार लागून किंवा पूर्व प्रारब्धानुसार चमत्कार करण्याची शक्ती प्राप्त झालेले;*

 *५) विशिष्ट वनस्पतिच्या सहाय्याने चमत्कार करणारे.*

*ज्या ज्या ठिकाणी चमत्कार हे चमत्कार म्हणून केलेले असतात त्या सर्व ठिकाणी ते चमत्कार वरील पाच प्रकारच्या सदरात मोडतात. वरील चमत्कार करणाऱ्यांचा परमार्थाशी काडीचाही संबंध नसतो.त्यांच्यापैकी बहुतेक लोक नास्तिक सुद्धां असतात.परंतु याच चमत्कार करणाऱ्या लोकांनी जर का दाढी जटा वाढवून साधूचा किंवा संन्याशाचा वेष धारण केला तर हजारो लोक त्यांच्यापाठी ते मोठे संत-सद्गुरू म्हणून मेंढराप्रमाणे त्यांच्या मागे धावतील याबद्दल जरासुद्धां संशय बाळगण्याचे कारण नाही.
*
संत चमत्कार करीत नाहीत याचा अर्थ त्यांच्या जीवनात चमत्कार घडत नाहीत असे नाही.संतांच्या जीवनात जे चमत्कार घडतात ते चमत्कार त्यांनी जाणुन बुजून केलेले नसतात तर काही विशिष्ट परिस्थितीत ते त्यांच्याकडून घडले गेलेले असतात.संतांचे मन हे दिव्य ईश्वरी शक्तिशी एकरूप झालेले असते.त्या अवस्थेत त्यांच्या मनात जो संकल्प निर्माण होतो तो सहज सिद्ध होतो.म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,*

*मनाचे संकल्प पाववील सिद्धी |*

error: Content is protected !!