वडगाव मावळ:
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ अंतर्गत मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा गणेश एकनाथ वाळुंजकर यांची निवड झाली .

जीवन शंकर गायकवाड यांची पाचव्यांदा  उपाध्यक्षपदी निवड झाली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड पंचायत समिती मावळ येथे पार पडली कार्यकरणी निवड सरचिटणीस कॉम्रेड  ज्ञानोबा घोणे व जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली .

जेष्ठ सल्लागार  राजेंद्र कांबळे,सुखदेव गोपाळे, माऊली काळे, भाऊ कल्हाटकर, ज्ञानेश्वर खुरसुले,पोपट गायकवाड, सहादू पोटफोडे,नाथा वांजळे,वाघू खराडे  उपस्थित होते.

error: Content is protected !!