इंदोरी:
चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) येथे चंद्रयान ३ मिशन याचे लाईव्ह प्रक्षेपण स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रयान ३ मिशन याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने या मिशनचे लाईव्ह प्रक्षेपण पाहिले.
या कार्यक्रमास संस्थेचे संचालक ,प्राचार्य ,शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.