साते:
जय शिवराय प्रतिष्ठान संचलित,सातेतील नानासाहेब बलकवडे माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीचे औचित्य साधून दिंडी सोहळा  उत्साहात साजरा करण्यात आला.

या दिंडीत विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या.
  विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या गजरात सहभाग घेतला. सदर दिंडीचे आयोजन संपूर्ण साते गावातून करण्यात आलेले होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सिताराम चांगदेव शिंदे यांनी विठू रायाची , संत ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ जगतगुरु तुकाराम महाराज यांची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
 
तसेच संस्थेचे मानद सचिव अविनाश बलकवडे व सुचेता बलकवडे यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. सदर दिंडीचे आयोजन सहशिक्षक  विकास पिंगळे,  संभाजी थिटे,  योगिता माझिरे, विष्णू चौधरी व लीला भोजने, विद्यालयाची माजी विद्यार्थिनी रुचिका आगळमे   बाळू जाधव  रावसाहेब जाधव यांनी केले.  योगिता माझिरे मॅडम यांनी आभार मानले.

error: Content is protected !!