वडगाव मावळ:
साते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष पोपट शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हणवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कै.तेजस (नाना) शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वही,पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी सरपंच मारूती शिंदे, सनिल शिंदे, चेअरमन संजय शिंदे, राजेंद्र बोराडे , गजानन शिंदे, विजय शिंदे, अमित नवघणे,रूपाली शिंदे, वंदना शिंदे, आनंद नवघणे ,अमर बोराडे,राजेश शिंदे ,अक्षय शिंदे, अजय केदारी यांच्यासह ग्रामस्थ ,विद्यार्थी ,पालक,शिक्षक उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला मिळालेल्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांनीही जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. वाढदिवसाच्या अनाठायी खर्चाला बगल देत सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला.