नवलाखउंब्रे:
आषाढी एकादशीच्या निमित्त इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या श्रीराम विद्यालय नवलाखउंबरे या माध्यमिक विद्यालयात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
रामनाथ बंधाले,सुरेश शेटे.जालिंदर शेटे, मारूती नरवडे, पाटील बुवा गायकवाड, श्रीराम भजनी मंडळाचे बबनराव पडवळ मराठे, यांनी भजन गायनासाठी विद्यार्थी बरोबर साथसंगत केली.
युवराज काकडे ,मारूती नरवडे यांचेकडून प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख युवराज सोनकांबळे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतरकर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली. मुख्याध्यापक गणपत कानगुडे यांनी स्वागत केले.