टाकवे बुद्रुक:
येथील बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल व सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी काढलेल्या पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा गजर सुरू होता.

हा दिंडी सोहळा आनंदात पार पडला, यात विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा व पारंपरिक वेष परिधान करून सहभाग घेतला. अनेक विद्यार्थिनी तुळस, ग्रंथ , विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती डोक्यावर घेऊन सोहळ्यात सहभागी झाल्या. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पालखी ची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन पालखी विसावली, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भजन केले. मग पुढे घोजगे चौकात गोल रिंगण करण्यात आले.  तिथे विठ्ठल विठ्ठल निनाद झाला, शिक्षकांनी व विद्यार्थिनींनी फुगडी चा आनंद लुटला.गावातील भैरवनाथ मंदिरात शिक्षक व विद्यार्थ्यांनी भजन किर्तन केले. पावसाची तमा न बाळगता नर्सरी पासून दहावी पर्यंतचे विद्यार्थी व शिक्षक विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन गेले.

संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले,सचिव रामदास वाडेकर,खजिनदार तानाजी असवले यांच्यासह शिक्षक,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!