निराधार आजी-आजोबांसोबत शालेय विद्यार्थ्यांनी वृध्दाश्रमात साजरा केला योग दिन
टाकवे बुद्रुक:
आदिवासी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी येथील सहारा वृध्दाश्रमात  निराधार आजी-आजोबांसमवेत आज  योग दिन साजरा केला.

आंदर मावळातील कुसवली या आदिवासी गावात पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक गोकूळ लोंढे,शिक्षिका संगीता ससाणे, केंद्र प्रमुख रघुनाथ मोरमारे यांनी योग दिन निराधार आजी-आजोबांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येथील सहारा वृध्दाश्रमातील निराधार आजी आजोबांसोबत सर्वांनी हा जागतिक दिन साजरा केला.

या प्रसंगी योगाचे महत्त्व, आरोग्य साधना व भारताची प्राचीन संस्कृती याविषयी शिक्षकांनी सर्वांना मार्गदर्शन केले. वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी आभार मानले.

error: Content is protected !!