तळेगाव स्टेशन:
नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार 21 जूनला हा दिवस साजरा केला जातो.

21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते यामुळे श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते.

नवीन समर्थ विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स तळेगाव दाभाडे येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या ९६५ विद्यार्थ्यांनी सामुदायिक योगासने करून योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे नियोजन  व अध्यापिका नेहा बारमुख,  आशा सातकर यांनी केले.

विद्यालयातील कला अध्यापक  योगेश पाटील यांनी आकर्षक फलक लेखन केले. यावेळी विद्यालयातील  साक्षी गायकवाड,  योगिता धडके , वैष्णवी पाडांगळे , समीक्षा मुंडे या विद्यार्थिनींनी मराठी, हिंदी ,इंग्रजी, संस्कृत या भाषांमधून योग दिनाची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली .

विद्यालयाच्या प्राचार्या वासंती काळोखे ,पर्यवेक्षक  रेवप्पा शितोळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व अध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे आभार  सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रभा काळे यांनी मानले.

error: Content is protected !!