संत निरंकारी मिशन तर्फे विश्व पर्यावरण दिवसा निमित्त लोणावळा-खंडाळा येथे विशाल स्वच्छता आणि वृक्षारोपण-अभियान संपन्न…
लोणावळा:( श्रावणी कामत ):
निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पावन आशीर्वादाने वैश्विक प्रदूषण व ग्लोबल वार्मिंगच्या संकटापासून जगाला वाचवण्यासाठी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मार्फत संयुक्त राष्ट्रांची थीम ‘बीट प्लास्टिक पोल्युशन’ या विषयाला अनुसरून विश्व पर्यावरण दिवस’ दिनी स्वच्छता अभियान लोणावळा-खंडाळा येथे संपन्न झाले. .
या अभियानाला सुमारे २००० हुन अधिक स्वयंसेवक उपस्थित होते.आपली पृथ्वी ग्लोबल वार्मिंग च्या संकटाचा सामना करत आहे अशावेळी आपल्याला वृक्षारोपण सारखे अभियान राबविण्याची नितांत गरज आहे ज्याच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल, हि गरज लक्षात घेऊन आज च्या या स्वच्छता अभिनयाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे झोनचे झोनल इन्चार्ज श्री ताराचंद करमचंदानी यांनी या अभियानाची विस्तृत माहिती देताना सांगितले की हे अभियान लोणावळा-खंडाळा परिसरात सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते,खंडाळा ते अमृतांजन पॉईंट,वलवन तळे, कावेरी फार्म,नागरगाव,लोहगड उद्यान,रायवूड ते लोणावळा डॅम गेट,आय.एन.एस. ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन,नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा येथे स्वछता अभियान संपन्न झाले. रायहुड पार्क मध्ये १०० वृक्षांची लागवड देखील करण्यात आली.
मिशनच्या युवा स्वयंसेवकांनी बीट प्लास्टिक पोल्युशन थीमवर लघु नाटिकांचे आयोजन करून लोकांना पर्यावरण संकटाविषयी जागृत होण्याची प्रेरणा दिली.
या अभियानाला शरद कुलकर्णी (उप-मुख्यधिकारी, लोणावळा नगरपरिषद), दत्तात्रय सुतार (आरोग्य अधिकारी), तसेच नगरपरिषदेचे आणि संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.
संत निरंकारी मिशन निरंतर आध्यात्मिक जागृतीबरोबरच मानवतेच्या सेवेमध्ये स्वत:ला सातत्याने समर्पित करत आले. या सेवांमध्ये मुख्यतः वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरांचे आयोजन यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मिशन समाजाच्या उत्थानासाठी महिला सशक्तिकरण व युवाशक्तीच्या उर्जेला सकारात्मक मागर्दशन करण्यासाठी अनेक कल्याणकारी परियोजना राबवित आहे.
अशा प्रकारच्या निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल मिशनला अनेक राज्यांकडून सन्मानित करण्यात आले आहे. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या पारमार्थिक सेवा मिशनमार्फत अविरतपणे केल्या जात आहेत. निश्चितपणे वेळोवेळी आयोजित केली जाणारी अशा प्रकारची अभियाने प्रकृतीचे संतुलन कायम ठेवण्यासाठी निश्चितच एक सार्थक पाऊल असून त्यामध्ये संत निरंकारी मिशन आपली महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे.
लोणावळा ब्रांच मुखी श्री महादेव सुतार यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस