नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या ‘टेकमंथन -२०२३’ मध्ये विविध आस्थापनांशी सामंज्यस करार
तळेगाव दाभाडे:
औद्योगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय वाढविण्याची गरज लक्षात घेऊन नूतन महाराष्ट्र विद्या  प्रसारक मंडळाच्या नूतन अभियांत्रिकीच्या संगणक विभागामार्फत ‘टेकमंथन -२०२३’ चे नुकतेच आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौशल्य हे औदयोगिक जगताशी जोडण्याचे काम यातून जास्त प्रमाणात होईल हे या टेकमंथन चे उद्धिष्ट होते.

  या कार्यक्रमास जी.एन सोल्युशन चे व्यवस्थापकीय संचालक महेश कुलकर्णी, इंडेक्स इंजिनचे व्यस्थापकीय संचालक संजीव जहागीरदार, डि.जी.एम महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड चे टी मनोजकुमार, मिटकॉन  कन्सल्टन्सी अँडइंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड चे संचालक गणेश खामगल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री  संजय भेगडे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, विश्वस्त महेशभाई शहा, उद्योजक दादासाहेब उऱ्हे, प्राचार्य डॉ. विलास देवतारे, एनसीईआरच्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, प्रा. मुजाईद  शेख, डॉ. नितीन धवस, डॉ. सतिश  मोरे, डॉ. सौरभ सावजी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
   याप्रसंगी नाशिक, औरंगाबाद, भोसरी, पुणे, आंबी, उर्से या औदयोगिक क्षेत्रातील विविध  आस्थापनातील व्यवस्थापक उपस्थित होते. तद्प्रसंगी बत्तीस आस्थापनांशी  सामंजस्य करार करण्यात आले. आस्थापनांमधील  इंटर्नशिप, औदयोगिक भेटी, उद्योजकांच्या मुलाखती, नोकरीच्या संधी, विद्यार्थी प्रशिक्षण आदी मुद्यांवर विद्यार्थ्यांना आस्थापनांकडून सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
  
  ” विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना फक्त अभ्यासी  ज्ञानापुरतेच मर्यादित न राहता विविध तांत्रिक कौशल्य देखील आत्मसात करून स्वतःचा विकास करावा,”असे मत महेश कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केले.
 
” अभ्यासक्रम आणि उद्योग जगतातील तंत्रज्ञान यातील अंतर हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत कमी करून प्रत्यक्ष औदयोगिक समूहासोबत काम करून औदयोगिक भेटी द्याव्यात, स्वतःला विकसित करण्यासाठी आजचा उपक्रम अतिशय सुंदर आहे” असे मत संजीव जहागीरदार यांनी व्यक्त केले.

    “भारत सरकारच्या स्कील इंडिया योजनेअंतर्गत युवकांना उद्योग संबधित कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनविले जात आहे. या योजनेचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे,” असे गणेश खामगेल पुढे बोलताना म्हणाले. 
   मनोजकुमार यांनी मेट्रो रेल्वेची तांत्रिक रचना, आधुनिक काळात मेट्रोची असणारी गरज याविषयी माहिती दिली.
  
” आपल्या शहराचा होणारा विकास त्याचबरोबर आपण स्वतःमध्ये तांत्रिक कौशल्य विकसित करून उद्योग क्षेत्रात प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख कशी निर्माण केली पाहिजे या संदर्भात  बाळा भेगडे यांनी आपले मत व्यक्त केले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रोहिणी हंचाटे यांनी केले.
  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशिका बन्सल आणि निधी हेडगे या विद्यार्थिनींनी केले. प्रा. धनश्री  पाटील यांनी आभार व्यक्त केले तर प्रा. धनाजी जाधव, प्रा. नेहा भागवत, प्रा. प्रीतम अहिरे, प्रा. मुजाईद शेख  यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

error: Content is protected !!