महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी बाळा भेगडे
वडगाव मावळ:
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली .
मागील काही महीण्यापुर्वी त्यांच्या जवळ १६ लोकसभेची प्रवासी म्हणून जबाबदारी मिळाली होती .त्यांनी १६ लोकसभेमध्ये प्रवास करून ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे बोलले जाते.
बाळा भेगडे यांना मागील दोन वर्षापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणूकीच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली होती.बाळा भेगडे हे महिनाभर पंढरपूर-मंगळवेढा येथे आपल्या कार्यकर्त्या बरोबर तळ ठोकून काम करत होते.त्याच्या बुथ कमिटी नियोजन बद्ध प्रचार कार्याने भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले होते.त्यानंतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोवा विधानसभा निवडणूकित गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती.तिथे देखील प्रभावी नियोजन करून प्रमोद सावंत यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला होता.
मा.राज्यमंत्री बाळा भेगडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू माणले जातात वेगवेगळ्या राज्यांमधील जबाबदारी मिळने ही मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी मिळाली या जबाबदारी मुळे महाराष्ट्रामध्ये मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे राजकीय वजन वाढले आहे.
मावळ तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावर आहे.
- शिवराज पॅलेस ‘ बँक्वेट हाॅलचे सीता खंडू वायकर व खंडू आबाजी वायकर यांच्या हस्ते उद्घाटन
- महागाव येथे कालाष्टमी व श्री. काळभैरवनाथ जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
- इंदोरीत शनिवार दि.२३ नोव्हेंबरला समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन
- रविवार, २४ नोव्हेंबर रोजी गझलपुष्पचा वर्धापनदिन सोहळा : रविंद्र भेगडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
- संपतराव पांडुरंग गराडे यांचे निधन